पुणे – दिवाळीला काही दिवस उरल्याने स्नेहलला कपडे खरेदी करण्यासाठी वेळ मिळाला नाही… त्यामुळेच तिने बाजारपेठेत जाऊन रेडिमेड अनारकली ड्रेस विकत घेतला अन्‌ कुटुंबीयांसाठीही मनसोक्त शॉपिंग केली. सध्या रेडिमेड कपडे विकत घेण्याचा ट्रेंड महिला- युवतींमध्ये वाढला असून, प्रत्यक्ष दालनात जाऊन डिझायनर आणि स्टायलिश कपडे विकत घेण्यासह महिला- युवती कपडे ऑनलाइनही ऑर्डर करत आहेत. एकाच ठिकाणी हव्या त्या प्रकारातील कपडे विकत घेता येतात, त्यामुळे रेडिमेड कपड्यांना या वर्षी सर्वाधिक मागणी आहे. बजेटमध्ये रेडिमेड कपड्यांची आकर्षक रेंज बाजारपेठांमध्ये उपलब्ध असून, साड्यांपासून ते अनारकलीपर्यंत प्रत्येकात नवनवीन व्हरायटी पाहायला मिळते.

दिवाळीसाठीचे कपडे टेलरकडून शिवून घेण्याचा पारंपरिक ट्रेंड असला तरी मनाला भावतील, असे कपडे बाजारात आणि ऑनलाइन संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. महिला- युवतींसह प्रत्येकाचा ओढा अशा कपड्यांकडे वाढला आहे. एक हजार रुपयांपासून ते तीन हजार रुपयांपर्यंत संपूर्ण आउटफीट खरेदी करता येतो. कपड्यांची दालने आणि संकेतस्थळावर १० ते ५० टक्‍क्‍यांची सूट दिल्याने रेडिमेडला पसंती मिळत आहे. डिझायनर साडी, अनारकली, घागरा, पंजाबी ड्रेस, कुर्ता विथ प्लाझो, लेहंगा असे विविध कपडे महिला- युवती ऑर्डर करत आहेत. लक्ष्मी रस्ता असो वा डेक्कन… शहरातील विविध ठिकाणच्या दालनांमध्ये रेडिमेड कपड्यांच्या खरेदीसाठी गर्दी होत आहे. 

तृप्ती चौगुले म्हणाली, ‘‘मी शिक्षणाच्या निमित्ताने पुण्यात राहत असल्यामुळे दिवाळीच्या खरेदीसाठी मला वेळ मिळाला नाही. त्यामुळेच मी लक्ष्मी रस्त्यावरील एका दालनातून डिझायनर अनारकली ड्रेस खरेदी केला. खास डिस्काउंट असल्याने खरेदीवर पैशांची बचत करता आली.’’ 

रेडिमेडला  ‘इंडो-वेस्टर्न’टच
दिवाळीसाठी हटके आणि वेगळी स्टाइल करावी, याकडे सर्वांचा भर असतो. यंदा रेडिमेडमध्येही ‘इंडो-वेस्टर्न’ टच देण्यात आला आहे. पारंपरिकतेच्या जोडीला पाश्‍चात्त्य डिझाइन्स अवलंब करत काहीसे हटके डिझाइन्स तयार करण्यात आले असून, त्याला महिला- युवतींची सर्वाधिक पसंती मिळत आहे.

पुरुषांचा कल ट्रॅडिशनलकडे
दिवाळीत जिन्स-शर्ट, कुर्ता-पायजमा, ट्रॅडिशनल शेरवानी, मोदी जॅकेट आणि ब्लेझर अशा आउटफीटमध्ये ‘इंडो-वेस्टर्न’ टचवर युवक भर देत आहेत. कुर्ता-पायजमा आणि शेरवानीतील हटके डिझाइन्सना मोठी मागणी आहे.

ऑनलाइनवर खास सूट
संकेतस्थळांनी देखील रेडिमेड कपड्यांवर खास सूट दिली आहे. कुर्ता असो वा अनारकली… कपड्यांवर १० ते ६० टक्‍क्‍यांची सूट आहे. विविध पर्याय संकेतस्थळावरही पाहायला मिळत आहेत.

News Item ID: 
51-news_story-1507741939
Mobile Device Headline: 
रेडिमेड कपडे खरेदीचा ट्रेंड
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

Vertical Image: 
English Headline: 
pune news Readymade clothes Shopping trends
सकाळ वृत्तसेवा
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
दिवाळी, पंजाब, शिक्षण, EducationSource link

Leave a Reply