आगामी लोकसभेसाठी यादीत नावे समाविष्ट करणार
पुणे – आगामी लोकसभा निवडणुकीत मतदान करायचे आहे; परंतु मतदार नोंदणी अभियानात ज्यांनी नावनोंदणी केलेली नाही, तसेच मतदार यादीतून नाव वगळले असेल किंवा ज्या तरुणांना नव्याने मतदार नोंदणी करायची आहे, त्यांना शेवटची संधी आहे. मतदार नोंदणी केल्यास आगामी निवडणुकीपूर्व यादीत त्यांची नावे समाविष्ट करण्यात येणार आहेत.

एक जानेवारी 2019 च्या अर्हता दिनांकानुसार अंतिम मतदार यादी 31 जानेवारीला जाहीर करण्यात आली. या संदर्भात तसेच आगामी लोकसभा निवडणूकविषयक माहिती देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक बुधवारी बोलावली होती. अंतिम मतदार यादीची प्रत सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना देण्यात आली. वगळण्यात आलेल्या मतदारांची यादी सर्व मतदार नोदणी अधिकारी कार्यालयांत प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्याची पडताळणी करण्यात यावी. तसेच, ज्यांना नव्याने मतदार नोंदणी करावयाची आहे, त्यांनी अर्ज क्रमांक 6 भरून संबंधित मतदार नोंदणी कार्यालयात जमा करावा. या मतदारांची नोंदणी करून त्यांना निवडणूकपूर्व मतदार यादीत समाविष्ट करण्यात येईल, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यातील मतदारसंघांत पाच हजार 170 मतदार केंद्रस्तरीय सहायकांची (बीएलए) नेमणूक करण्यात आली आहे. मतदारांचे छायाचित्र नसेल किंवा कृष्णधवल छायाचित्र असल्यास मतदारांची माहिती अद्ययावत करण्यात यावी. परंतु हे प्रमाण कमी असून, राजकीय पक्षांनी मतदार केंद्रस्तरीय सहायकांची नेमणूक करावी, असे आवाहन या वेळी करण्यात आले.

पुणे जिल्हा अंतिम मतदार यादी
एकूण मतदार संख्या – 73 लाख 63 हजार 812
नवीन समाविष्ट मतदारांची संख्या – दोन लाख 888
वगळलेल्या मतदारांची संख्या – 26 हजार 421
मतदान केंद्रांची संख्या – 7 हजार 666

नवीन ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशिन
पुणे जिल्ह्यासाठी सातारा आणि सांगली येथून नवीन ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशिन उपलब्ध होणार आहेत. याबाबतची माहिती सर्व राजकीय पक्षांना देण्यात आली आहे. मशिन प्राप्त झाल्यावर प्राथमिक तपासणी करण्याबाबत संबंधित राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना पत्राद्वारे कळविण्यात येणार आहे.

मतदान केंद्रे वाढणार
जिल्ह्यात सुमारे दोन लाख मतदार वाढले आहेत, त्यामुळे 250 साहाय्यकारी मतदान केंद्रे वाढतील. याबाबतची माहिती मतदार नोंदणी कार्यालयात उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती या वेळी देण्यात आली.

News Item ID: 
558-news_story-1550080858
Mobile Device Headline: 
मतदार नोंदणीची शेवटची संधी
Appearance Status Tags: 
Voting-ListVoting-List
Mobile Body: 

Vertical Image: 
English Headline: 
Voter Registration Loksabha Election List
सकाळ वृत्तसेवा
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
पुणे, लोकसभा, मतदार यादी, निवडणूक, Administrations, Political Parties
Twitter Publish: Source link

Leave a Reply