पुणे : प्रेम करून लग्न केलं, त्यानंच काही रुपयांसाठी माझं शरीर बाजारात गहाण ठेवलं. त्यानंतर आयुष्यात पुरुषांचा आणि माझ्या शरीराचा संबंध फक्त काही तासांच्या व्यवसायासाठी येतो. यामध्ये मनाला थाराच नसतो. त्यामुळे प्रेम हे हळवं आणि निस्वार्थी असतं, यावरचा विश्वासच उडाला. एका वेश्येच्या आयुष्यात प्रेमाची व्याख्या यापेक्षा वेगळी काय असणार?…
सांगत होती बुधवार पेठेतील कुंटणखान्यातील एक वेश्या. सगळीकडे “व्हॅलेंटाइन डे’ची धामधूम सुरू असताना कायमच दुलर्क्षित राहिलेल्या या समाजघटकातील एका प्रतिनिधीशी संवाद साधला. चमेली (नाव बदलले आहे) मूळची पश्चिम बंगालमधील. इतर मुलींप्रमाणेच लग्न करून सुखी आयुष्य जगण्याची तिची इच्छा होती. दहा वर्षांपूर्वी एक मुलगा तिच्या आयुष्यात आला. त्याच्याबरोबर लग्न करून संसार करण्याचे स्वप्न ती बघत होती. प्रेमामध्ये आकंठ बुडाल्याने तो मुलगा नेमका कुठला? नक्की काय करतो? याचा कुठलाही विचार न करता तिने त्याच्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवला.
लग्न केलं, मुलं झाली, तेव्हा तिला वाटलं जीवन सार्थकी लागलं. पण, आयुष्य काहीतरी वेगळं वळण घेईल, असं तिला वाटलंच नव्हतं. तिच्याही नकळत एक दिवस नवऱ्यानेच बुधवार पेठेतील कुंटणखान्यात तिला विकलं. तिच्यासारख्या अनेक जणी फसवणूक झाल्याने किंवा स्वेच्छेने हा व्यवसाय करीत आहेत. त्यांच्या आयुष्यात निस्वार्थ प्रेमाची नजरही वाट्याला येत नाही.
चमेली सांगते, की भेटवस्तू, प्रेम, व्हॅलेंटाइन हे सगळं खोटं आहे. माझ्या शरीराला गहाण ठेवून नवऱ्याने कर्ज काढलं. ते कर्ज फिटेपर्यंत अनेक पुरुषांच्या वासनेला सामोरं जावं लागलं. आता कर्ज फिटल्यावर नवऱ्याला पैशाची चटक शांत बसू देत नाही. रोज माझा नवरा माझ्या शरीराची वेगवेगळी बोली लावतो. घरी आल्यावर पुन्हा दारू पिऊन बेदम मारहाण करतो.
इतर स्त्रियांसाठी नवरा हे सुरक्षित ठिकाण असते. परंतु, माझ्यासाठी तो फक्त राक्षसी पशू आहे. मला या जगात एकही विसाव्याचं ठिकाण नाही, त्यामुळे प्रेम ही गोष्ट माझ्या गावीच नाही.
– चमेली

You must be logged in to post a comment.