पुणे : बालेवाडी फाट्याजवळील चाकणकर मळा येथे रात्री काल (बुधवारी) रात्री गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने आग लागल्याची दुर्घटना घडली असून यात एक हाॅटेल, दुचाकी शोरूम व गॅरेज यांना आग लागून साहित्यासह दुचाकी जळाल्या.

वीस दुचाकी सुस्थितीत काढण्यात अग्निशमन दलाला यश आले. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार येथील सिलिंडर स्फोट होऊन आग लागली व ही आग शेजारी इतरत्र पोहचली. या आगीमुळे हाॅटेल स्वराजमधील गॅस सिलिंडरचाही स्फोट झाला.

या आगीत कुठलीही जीवितहानी झालेली नसून अग्निशमन दलाच्या वतीने शर्थीचे प्रयत्न करून आग विझवण्यात आली. यासाठी अग्निशमन दलाच्या तीन फायर गाड्या व दोन टँकरने ही आग आटोक्यात आणण्यात आल्याचे अग्निशमन अधिकारी शिवाजी मेमाणे यांनी सांगितले. ही आग गॅरेजकडून हाॅटेल स्वराज व शोरूमकडे  आली.

हाॅटेलमध्ये आग पोहचताच गॅस सिलिंडरचा स्फोट झाला व आतील साहित्य इस्ततः उडून गेले.त्याबरोबर दुचाकी शोरूम,फॅब्रिकेशनचे दुकान यांनाही  थोड्या प्रमाणात आगीची झळ पोहचली.

News Item ID: 
558-news_story-1550126517
Mobile Device Headline: 
पुण्यात बालेवाडी फाटा येथे आग; जीवितहानी नाही
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

पुणे : बालेवाडी फाट्याजवळील चाकणकर मळा येथे रात्री काल (बुधवारी) रात्री गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने आग लागल्याची दुर्घटना घडली असून यात एक हाॅटेल, दुचाकी शोरूम व गॅरेज यांना आग लागून साहित्यासह दुचाकी जळाल्या.

वीस दुचाकी सुस्थितीत काढण्यात अग्निशमन दलाला यश आले. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार येथील सिलिंडर स्फोट होऊन आग लागली व ही आग शेजारी इतरत्र पोहचली. या आगीमुळे हाॅटेल स्वराजमधील गॅस सिलिंडरचाही स्फोट झाला.

या आगीत कुठलीही जीवितहानी झालेली नसून अग्निशमन दलाच्या वतीने शर्थीचे प्रयत्न करून आग विझवण्यात आली. यासाठी अग्निशमन दलाच्या तीन फायर गाड्या व दोन टँकरने ही आग आटोक्यात आणण्यात आल्याचे अग्निशमन अधिकारी शिवाजी मेमाणे यांनी सांगितले. ही आग गॅरेजकडून हाॅटेल स्वराज व शोरूमकडे  आली.

हाॅटेलमध्ये आग पोहचताच गॅस सिलिंडरचा स्फोट झाला व आतील साहित्य इस्ततः उडून गेले.त्याबरोबर दुचाकी शोरूम,फॅब्रिकेशनचे दुकान यांनाही  थोड्या प्रमाणात आगीची झळ पोहचली.

Vertical Image: 
English Headline: 
Fire at balewadi phata in Pune no causalities
सकाळ वृत्तसेवा
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
पुणे, आग, सिलिंडर
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Pune Fire, Balewadi Phata, Pune News, marathi news, Pune Fire brigade
Meta Description: 
Fire at balewadi phata in Pune no causalitiesSource link

Leave a Reply