पिंपरी (पुणे) : गॅस गळती होऊन झालेल्या स्फोटामध्ये पाच जण जखमी झाले. ही घटना कासारवाडी येथे सोमवारी सकाळी घडली. शोभा बिराजदार (वय ३०), गणेश बिराजदार (वय ८), शुभम बिराजदार (वय ५), देवांग बिराजदार (वय ३), विजय जाधव (वय २२, सर्व रा. गुरूनानक कॉलनी, केशवनगर, कासारवाडी) अशी जखमी झालेल्या एकाच कुटुंबातील पाच जणांची नावे आहेत.
अग्निशामक दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिराजदार यांच्या घरातील गॅसची रात्रभर गळती झाली. सकाळी या गॅसचा आगीशी संपर्क आल्याने स्फोट झाला. यामध्ये पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर वायसीएम रुग्णालयात प्रथम उपचार करून पुढील उपचारासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

You must be logged in to post a comment.