पुणे : महाराष्ट्रात दलित-मराठा भांडण लावण्याचे काम ब्राम्हणवादी करत आहेत. न्यायालयाच्या निर्णयाचा स्वागत आहे. परंतू महाराष्ट्र राज्यात हुकूमशाही सुरू आहे, असा आरोप भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांनी केला आहे.
भीम आर्मीच्या पुण्यातील सभेला आज मुंबई उच्च न्यायलयाने परवानगी नाकारली आहे. यानंतर हॉटेलमध्ये निवडक पत्रकारांशी बोलताना आझाद यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
भीमा कोरगावला जाण्यापासून मला कोणी रोखू शकत नाहीत. महाराष्ट्रात भीम आर्मी संघटन मजबुत करणार, असे देखील आझाद यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. तसेच, कोरेगाव भीमा दंगलीतील आरोपी संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे यांना नजरकैदेत ठेवले जात नाही असा आरोप देखील त्यांनी यावेळी केला.
भीम आर्मी या राष्ट्रीय पातळीवरील संघटनेचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद ऊर्फ रावण हे रविवारी (ता.30) रात्री पुण्यात दाखल झाले. आझाद यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले होते. रविवारी पोलिसांनी सुटका केल्यानंतर ते पुण्याला आले. सध्या सागर प्लाझा हॉटेलमध्ये असून हॉटेलबाहेर कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, कोरेगाव भीमामध्ये मृत्यू झालेल्या पूजा सकट या मुलीच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या आरोपींना अटक करा, या मागणीसाठी पोलिस आयुक्तांना भेटणार आहेत आहेत.

You must be logged in to post a comment.