पुणे: शासनाने लागू गेलेल्या जीएसटीबाबत व्यापारी प्रचंड ञस्त आहेत. दररोज वेगवेगळी परिपञकामुळे काढली जातात, महिन्यातून तीन वेळा रिटर्नस सादर करणे अतिशय किचकट आहे. शेतीमालावर कर लागणार नाही सांगत धने, मिरची, हळद आणि चिंचेवर सरसकट पाच टक्के जीएसटी लागू केला. यामुळे शासनाने तातडीने अडचणी दूर कराव्यात अन्यथा व्यापारी देशव्यापी बंद करतील, असा इशारा दि पूना मर्चंटस् चेंबरच्या वतीने देण्यात आला आहे.  

जीएसटी बाबत व्यापा-यांना येणाऱया अडचणी संदर्भांत दि पूजा मर्चंटस् चेंबर पञकार परिषेद आयोजित केली होती. यावेळी चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, वालचंद संचेती, प्रवीण चोरबेले, जवाहरलाल बोथरा उपस्थित होते.

‘ई सकाळ’वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : Source link

Leave a Reply