पुणे – सोलापूर रस्त्यावर काही ठिकाणी पाणीपुरवठा विस्कळित झाल्यामुळे हडपसर, वानवडी आणि कोंढव्यातील नगरसेवक महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शुक्रवारी आक्रमक झाले. दरम्यान 30 हजार लिटर क्षमतेच्या नवीन टाकीचे बांधकाम दोन महिन्यांत पूर्ण झाल्यावर पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले.  हडपसर, वानवडी आणि कोंढव्यातील पाणीपुरवठा विस्कळित झाल्याचा मुद्दा सर्वसाधारण सभेचे कामकाज सुरू झाल्यावर वैशाली बनकर यांनी उपस्थित…

पुणे – बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या पुण्यातील तत्कालीन क्षेत्रीय अधिकाऱ्यासह सुरत येथील खासगी लॉजिस्टिक्‍स कंपनीच्या संचालकाला बॅंक फिक्‍सिंगप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषणने (सीबीआय) अटक केली आहे. ‘चालक से मालक’ या योजनेअंतर्गत सुमारे ८३६ कोटी रुपयांच्या कथित गैरव्यवहारप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. सुरत येथील सिद्धिविनायक लॉजिस्टिक्‍स लिमिटेड कंपनीने २०१२ मध्ये ‘चालक से मालक’ ही योजना सादर केली. रूपचंद बैद…

पुणे – महापालिका हद्दीच्या पूर्वेकडील उरुळी देवाची आणि फुरसुंगी ही गावे झपाट्याने वाढली आणि अजूनही वाढतच आहेत; पण येथील कचरा डेपोमुळे या दोन्ही गावांतील रहिवासी प्रचंड हैराण झाल्याचे त्यांच्याशी गप्पा मारल्यानंतर जाणवले. ‘आमची गावे महापालिकेत सामावून घेण्याची प्रक्रिया सुरू झाली, तरी आमच्या हद्दीत कचरा डेपो नकोच,’ या भूमिकेवर येथील गावकरी ठाम आहेत. ‘‘कचरा डेपो न…

खडकवासला – धरण साखळीतील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने खडकवासला धरण शुक्रवारी रात्री नऊ वाजता 97 टक्के भरले. त्यानंतर धरणातून 1706 क्‍युसेकने पाणी मुठा नदीत सोडण्यात आले. यासाठी धरणाचे चार व सहा क्रमांकाचे दरवाजे एक फुटाने उघडण्यात आले. त्याचबरोबर, कालव्यातून अकराशे क्‍युसेक असे एकूण सुमारे 2800 क्‍युसेकने पाणी सोडून धरणाची पातळी कायम ठेवली जात…

पुणे – शहरातील 343 बॅंकांत महापालिकेच्या सुमारे 1 हजार 450 कोटी रुपयांच्या ठेवी आहेत; तसेच 24 तास पाणीपुरवठा योजनेसाठी अर्थसंकल्पात 304 कोटी रुपयांची तरतूद आहे, असे असतानाही महापालिकेने 200 कोटी रुपयांचे कर्ज का घेतले, या प्रश्‍नावर प्रशासनाला शुक्रवारी समाधानकारक खुलासा करता आला नाही.  सर्वसाधारण सभेत प्रश्‍नोत्तरांच्या तासात नगरसेवक आबा बागूल यांनी महापालिकेच्या ठेवी, अनामत रक्‍कम…

पुणे – “”स्वाभिमानी संघटनेच्या सदस्यांच्या चौकशी समितीसमोर प्रश्‍नांची सविस्तर उत्तरे दिली आहेत. स्वाभिमानीला पूर्णविराम दिला आहे; पण नेतृत्वाने पुढील निर्णय लवकरात लवकर घ्यावा. यापुढे कोणत्याही चौकशी समितीला सामोरे जाणार नाही. नेतृत्वाच्या अंतिम निर्णयानंतर माझी पुढील भूमिका मांडेन,” असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व राज्याचे कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले.  नवीन…

पुणे – महापालिकेच्या शहर सुधारणा, विधी, महिला व बालकल्याण, क्रीडा समितीसह आता जैवविविधता आणि नाव समितीच्या अध्यक्षांना चालकासह महापालिकेची मोटार देण्याचा ठराव सत्तारूढ भारतीय जनता पक्षाने बहुमताच्या जोरावर शुक्रवारी मंजूर केला.  महापालिकेकडून चार विषय समित्यांच्या अध्यक्षांना पूर्वीपासूनच मोटारी दिल्या जातात. आता त्यात जैवविविधता आणि नाव समितीच्या अध्यक्षांची भर पडली आहे. पूर्वीच्याच चार समित्यांना मोटारी द्याव्यात,…

पुणे – पाणीपट्टीची थकबाकी असलेल्या महापालिका हद्दीबाहेरील ग्रामपंचायतींना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा ठराव विरोधी पक्षांनी तीव्र विरोध करूनही सत्तारूढ भारतीय जनता पक्षाने बहुमताच्या जोरावर शुक्रवारी सर्वसाधारण सभेत मंजूर केला. सर्वच ग्रामपंचायतींना या धर्तीवर पाणीपुरवठा करावा आणि थकबाकीचा पहिला हप्ता भरल्यावर पाणीपुरवठा करावा, या विरोधकांच्या उपसूचनाही भाजपने फेटाळल्या.  केशवनगर, साडेसतरानळी, महादेवनगर व मांजरी या ग्रामपंचायतींना महापालिकेने टॅंकरद्वारे पाणीपुरवठा…

पुणे/औंध – हिंजवडी येथील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील एका नामांकित आयटी कंपनीतील तरुणीचा विनयभंग केल्याचा धक्‍कादायक प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. हा प्रकार पौड पोलिस ठाण्याच्या हद्दीत चांदे-नांदे परिसरात बुधवारी दुपारी चारच्या सुमारास घडला. या घटनेमुळे तरुणीला मानसिक धक्‍का बसला असून तिच्यावर बाणेर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  चेन्नई येथील 33 वर्षीय तरुणी हिंजवडी येथील एका आयटी…

टाकळी हाजी (ता. शिरूर, जि. पुणे): शिंदेवाडी (ता. शिरूर) परीसरात पुन्हा हिवतापाचे रूग्ण आढळून आले आहेत. या भागातील अस्वच्छता पहाता पुन्हा आजाराचे प्रमाण वाढत असल्याची स्थिती आहे. कवठे येमाई येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हिवतापाचे रूग्ण तपासणीसाठी येऊ लागले आहेत. यासाठी आरोग्य विभागाने विशेष तपासण्या सुरू करणे अपेक्षीत आहे. अशी मागणी जोर धरू लागली आहे. शिरूर…