महापालिकेचे खासगी रुग्णालयांना आदेश पुणे – खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल असलेल्या डेंगीच्या अत्यवस्थ रुग्णांचे रक्तनमुने तपासणीसाठी महापालिकेच्या रुग्णालयात पाठविण्याचा आदेश शहरातील रुग्णालयांना देण्यात आला आहे. ही रक्ततपासणी मोफत होणार असल्याने रुग्णांकडून शुल्क घेऊ नये, असेही या आदेशात स्पष्ट केले आहे.  पावसाळा सुरू झाल्याने शहरात डेंगी, चिकुनगुन्या, हिवताप या कीटकजन्य आजारांचा फैलाव होण्याचा धोका वाढत आहे.…

जुन्नर : जुन्नरच्या पश्चिम आदिवासी भागात पावसाने ओढ दिल्याने भात लावणीची कामे खोळंबली होती. मात्र गेल्या तीन दिवसांपासून होत असलेल्या जोरदार पावसामुळे ती जोमाने सुरु झाली आहेत. आदिवासी भागातील भात हेच मुख्य पीक आहे. सुमारे १२हजार ५००हेक्टर क्षेत्र भात पिकाखाली येते. भात पिकाची ५० टक्के लावणीची कामे झाली होती तर काही भागात पुरेसा पाऊस न…

बसच्या वेळापत्रकाची काटेकोर अंमलबजावणी पुणे – बस कोणत्या ठिकाणी आहे, ती किती वाजता निघाली आणि किती वाजता पोचली. थांब्यावर किती वेळ थांबली. त्यात किती प्रवासी होते. किती उत्पन्न मिळाले आदी माहिती पुणे महानगर परिवहन महामंडळातर्फे (पीएमपी) विकसित करण्यात आलेल्या अत्याधुनिक नियंत्रण कक्षात मिळत आहे. त्यामुळे बसचालक आणि वाहकांना आता थांब्यावर वेळेत बस पोचविणे भाग पडणार…

पुणे : ”पूर्वी व्यापाऱ्यांना चोर समजून त्यांच्याकडून सुमारे चाळीस प्रकारचे कर आकारण्यात येत होते. करावरही कर आकारला जात होता. परिणामी ‘इन्स्पेक्‍टरराज’ला तोंड द्यावे लागत होते. मात्र, आता वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) संपूर्ण देशात लागू झाल्याने ‘इन्स्पेक्‍टराज’पासून मुक्ती मिळणार आहे,” असे मत केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले.  व्यापारी आणि ग्राहकांसाठी आयोजित ‘जीएसटी’ परिसंवादात…

पुणे : मराठीतील ज्ञानाचे भांडार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या “विश्‍वकोशा’तील नोंदी जुन्या झाल्या आहेत. काही नोंदी कालबाह्य झाल्याने राज्य सरकारच्या मराठी विश्‍वकोश निर्मिती मंडळाने “विश्‍वकोश’ अद्ययावत करण्यासाठी पावले उचलली आहेत. त्यासाठी वेगवेगळ्या विषयांवर आधारित संकेतस्थळांची निर्मिती करण्याचे काम सुरू आहे. ते पूर्ण झाल्यानंतर “विश्‍वकोश’ 24 तासांच्या आत अद्ययावत करणे शक्‍य होणार आहे. शिवाय, एखाद्या विषयावरील माहिती…

कात्रज : जप्त केलेल्या वाहनांचा पीएमपीच्या कात्रज आगारात डोंगर उभारून प्रादेशिक परिवहन मंडळाने अडगळ निर्माण केली आहे. वाहने हटवण्यासाठी गेली अनेक वर्षे पीएमपी प्रशासनाने आरटीओकडे केलेला पाठपुरावा अपयशी ठरल्यानंतर अखेर पीएमपीनेच जागा शोधून ती वाहने स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, डास उत्पत्तीचे केंद्र ठरू पाहणारा वाहनांचा डोंगर त्वरित हटवावा, अशी मागणी होत आहे.  कात्रज…

पुणे : शहरात रस्त्यांची लांबी तेवढीच; पण वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. सिग्नलला पोलिस उभे असतील, तरच आम्ही नियम पाळणार, या मानसिकतेमधून बाहेर येत वाहनचालकांनी स्वयंशिस्त पाळली पाहिजे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम झाली, तर वाहतूक कोंडीसह बरेच प्रश्‍न मार्गी लागतील, असे मत वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्‍त अशोक मोराळे यांनी व्यक्‍त केले.  मोराळे यांनी वाहतुकीच्या…

पुणे : ‘सूर निरागस हो…’ हे गायक महेश काळे यांच्या आवाजातील गाणे सादर होते. त्यावेळी ते थेट श्रोत्यांच्या काळजाळा जाऊन भिडत होते. अशीच स्वरांची किमया पुढचे दीड-दोन तास श्रोते अनुभवत होते आणि स्वरांच्या विश्‍वात तल्लीन होत होते.  श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त गणेश कला क्रीडा रंगमंच येथे आयोजित सांस्कृतिक महोत्सवात महेश…

खडकवासला : खडकवासला धरण साखळीतील चार धरणांत मिळून 10.06 टीएमसी म्हणजे 34.52 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. हा पाणीसाठा शहराला किमान साडेसात महिने पुरेल एवढा असून, त्यातून शेतीसाठी उन्हाळी दोन आवर्तने देता येतील. गेल्या वर्षी आजच्या दिवशी चार धरणांत 14.32 टीएमसी म्हणजे 49.11 टक्के पाणीसाठा जमा झाला होता. हा साठा गेल्या वर्षीपेक्षा चार टीएमसी कमी…

पुणे – डेबिट आणि क्रेडिट कार्डची हुबेहूब नक्‍कल (क्‍लोनिंग) करून त्याद्वारे एटीएममधून पैसे काढून फसवणूक करणाऱ्या दोन नायजेरियन्सना सायबर गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्यांच्या ताब्यातून 20 डेबिट कार्ड, सात ब्लॉक क्‍लोनिंग केलेली कार्ड आणि आठ मोबाईल असा सुमारे पावणेदोन लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ऑकवेहॅश फॉरच्युश (रा. न्यू लक्ष्मीनगर, पिंपळे गुरव) आणि…